Stories
शिक्षकांचे किस्से: मनिषा भिसे, पिंपरी चिंचवड
2 Feb 2023
3
mins to learn this perspective
मी मनिषा भिसे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या, थेरगाव कन्या शाळेतील शिक्षिका. मी इयत्ता चौथीच्या वर्गाला शिकवते. माझा जन्म सातारा जिल्ह्यातील, फलटण तालुक्यातील छोट्याश्या खेडेगावामध्ये झाला. गाव छोट असल्याने तिथे सुख-सुविधा जास्त नव्हत्या परंतू ‘शाळा’ ही आमच्या गावाला मिळालेली देणगीच होती. गावच्या लोकसंख्येपेक्षा माझ्या शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या जास्त होती. माझे उच्च माध्यमिक पर्यंतचे शिक्षण याच शाळेत झाले.
परिस्थिती बेताची असल्याने आणि आईची इच्छा असल्याने मी शिक्षण क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला. डी. एड. पुर्ण केल्यानंतर सी.ई.टी. मधून उत्तीर्ण होउून नोकरी मिळवणे. हे एकच ध्येय माझ्यासमोर होते. यासाठी दिवसातील १४ ते १८ तास अभ्यास करून मी माझे ध्येय गाठले आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये मला शिक्षक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. याच संधीचे सोने करत ज्ञानदानाचे काम मी प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करत आहे. शिक्षक म्हणून काम करत असतानाच मी माझे एम. ए. बी. एड. पर्यंतचे शिक्षण पुर्ण केले.