top of page

Stories

शिक्षकांचे किस्से: माधुरी बारकूल, पिंपरी चिंचवड

30 Dec 2022

3

mins to learn this perspective


मी श्रीमती माधुरी बारकूल. सध्या मी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सोनावणेवस्ती शाळेमध्ये उपशिक्षिका म्हणून कार्यरत आहे. माझे १२ वी पर्यंतचे शिक्षण माझ्या गावी, म्हणजेच उस्मानाबाद जिल्ह्यातील येरमाळा या गावी झाले. मला बारावीला सायन्स मध्ये ८४% होते, त्यामुळे मला काहीतरी वेगळे करावेसे वाटत होते. BSc Agriculture करून अधिकारी होण्याचे माझे स्वप्न होते; पण घरच्यांच्या आग्रहामुळे, मुलींसाठी शिक्षण क्षेत्र चांगले व सुरक्षति आहे म्हणून Diploma of Education हा पर्याय निवडला.


माझे D.Ed चे शिक्षण ‘डाएट कॉलेज पुणे’ येथ झाले. मे २०१० मध्ये झालेल्या MHT-CET परीक्षेत मी उत्तीर्ण झाली व शिक्षक म्हणून माझी नियुक्ती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत झाली. आपले जेव्हा शिक्षण चालू असते तेव्हा परिस्थिती खूप सोपी वाटते, पण प्रत्यक्ष फील्डवर काम करताना विविध समस्या अनुभवयला मिळतात. पालकांची शिक्षणाबद्धल अनास्था, घरचे वातावरण, मुलांच्या वैयक्तिक समस्या, प्रशासकिय कामे , विविध ऑनलाईन कामे व विविध अशैक्षणिक कामे यांमुळे शिक्षकांना मिळणारा वेळ व विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता टिकवणे या